Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडी

'ऑनलाईन रमी'मुळे ४२ जणांची आत्महत्या

'ऑनलाईन रमी'मुळे ४२ जणांची आत्महत्या

आणखी एक राज्यपाल वादग्रस्त ठरणार!

चेन्नई : 'ऑनलाईन रमी' या पत्त्यांच्या खेळापोटी तामिळनाडूमध्ये ४२ जणांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

देशभरात सध्या 'ऑनलाईन रमी'च्या जाहिरातींचा भडीमार सुरु आहे. सोशल मीडियावर तर विविध सेलिब्रिटींकडूनच या जाहिराती केल्या जात आहेत. महाराष्ट्रातही या 'ऑनलाईन रमी'च्या जाहिरातींनी ऊत आणला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले महिला आणि पुरुष कलाकार या जुगाराच्या खेळाच्या जाहिराती करत आहेत. या जाहिरातींमधून ते लोकांना जुगार खेळण्यास प्रोत्साहित करत असल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आला आहे. यावर टीकाही होत आहे.

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये याबाबत थानथाई पेरियार द्रविडर काझगम (टीपीडीके) या सामाजिक आणि राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. तामिळनाडूत 'ऑनलाईन गेम्स' आणि 'ऑनलाईन' जुगारावर प्रतिबंधक विधेयक राज्यपालांनी परत पाठवल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

ऑनलाईन रमी या जुगाराच्या नादी लागल्याने राज्यात ४२ जणांनी आत्महत्या केल्याचा दावा या संघटनेने केला असून याला राज्यपालच जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आत्महत्या केलेल्या चार जणांच्या अस्थी आम्ही गोळा केल्या असून त्या पोस्टाद्वारे राजभवनावर पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती टीपीडीकेचे प्रमुख अनूर जगदीशन यांनी सांगितले.

जुगाराच्या खेळाच्या जाहिराती करणा-या कलाकारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

Comments
Add Comment