मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर भाजप उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या वतीने कुडाळ, मालवण येथील दिव्यांगांसाठी व्हीलचेअरचे मोफत वाटप करण्यात आले.
रोजच्या जीवनात दिव्यांग व्यक्तींना दळणवळण कामात प्रचंड समस्यांना सामना करावा लागतो. रेल्वे स्थानके, बस स्थानके, सरकारी कार्यालये, पर्यटन स्थळे व सार्वजनिक जागा या सर्व ठिकाणी ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या दृष्टीने व्हीलचेअर असणे गरजेचे आहे. ठाण्यातील भाजपचे शहर उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी गोष्टींची दखल घेऊन कुडाळ मालवण या परिसरातील दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे मोफत वाटप करण्यात आले. सदरच्या व्हीलचेअरचे माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप होत असलेल्या लोकपयोगी उपक्रमाचे दिव्यांग बांधवांकडून कौतुक होत आहे.यावेळी कमलेश राणे, अल्केश कदम, जयनारायण गुप्ता, विकी चाको, उमान शेख, रितेश पावसकर आदी उपस्थित होते.