हवामान खात्याकडून ‘या’ चार जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट!
पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे बळीराजा संकटात सापडला असतानाच आता यात आणखी भर पडणार आहे. पुढील ५ दिवस राज्यात अवकाळी पाऊस होणार आहे. भारतीय हवामान विभागाने १५ ते १८ मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात १६ मार्च रोजीसाठी चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. यात उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे.
१६ तारखेला जाहीर करण्यात आलेल्या ऑरेंज अलर्ट मध्ये पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई ते गडचिरोली आणि कोल्हापूर ते नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.