'नुक्कड' मधील 'खोपडी' फेम समीर खाखर यांचे निधन

  274

मुंबई : सलमान खानच्या 'जय हो' मधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते समीर खक्कर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका नुक्कड (१९८६) मध्ये 'खोपडी' या मद्यपीची अतिशय प्रसिद्ध व्यक्तिरेखा समीर खक्कर यांनी साकारली. तेव्हापासून ते खोपडी या नावानेही ओळखले जात होते.


समीर खक्करचे भाऊ गणेश खक्कर यांनी सांगितले की, समीर खक्कर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. काल दुपारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते बेशुद्ध झाले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आज पहाटे ४.३० वाजता त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.


बोरिवलीतील बाभई नाका स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


समीर खक्कर हे बोरिवली येथील आयसी कॉलनीमध्ये एकटेच राहत होते. समीर खक्कर यांची पत्नी अमेरिकेत राहते. अॅमेझॉन प्राइमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जी' या मालिकेत ते अखेरचे दिसले होते.


समीर त्यांच्या ३८ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत विविध टीव्ही शो आणि चित्रपटांचा भाग होते. या अभिनेत्याने शोबिझमधून थोडा ब्रेक घेतला होता आणि ते यूएसएमध्ये स्थायिक झाले होते. नंतर, त्यांनी पुनरागमन केले आणि दोन गुजराती नाटके देखील केली आणि सलमान खानच्या 'जय हो' मधील भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले.


समीर यांनी मनोरंजन, सर्कस (शाहरुख खानसोबत) सारख्या मालिकांमध्येही काम केले. समीर यांनी 'परिंदा', 'ईना मीना डीका', 'दिलवाले', 'राजा बाबू', 'आतंक ही आतंक', 'रिटर्न ऑफ ज्वेल थीफ', 'अव्वल नंबर', 'प्यार दीवाना होता है', 'हम हैं कमाल के' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता