‘चतुरंग’चे विद्याधर निमकर यांना ‘ध्याससन्मान’ पुरस्कार
मुंबई: ‘चैत्रचाहूल’ या २२ मार्च रोजी होणाऱ्या मराठी नववर्षाच्या स्वागत सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांना चैत्र चाहूलचा ‘रंगकर्मी सन्मान’ आणि ‘चतुरंग’चे विद्याधर निमकर यांना ‘ध्याससन्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी १०.३० वा. दादर येथील शिवाजी नाट्य मंदीर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अॅड फिझ आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्याचं हे सोळावं वर्ष आहे. मराठी नववर्षाच्या शुभेच्छा मराठी संस्कृतीचा जागर करून देणे हे या सोहळ्यामागील उद्दिष्ट आहे. यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी संस्कृतीच्या जागरासोबत सामाजिक भानही राखण्यात आले आहे. यासाठीच सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या या दोन थोर व्यक्तिमत्वांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक महेंद्र पवार यांनी दिली आहे.