Sunday, August 31, 2025

नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार!

नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार!

काँग्रेसच्या माजी मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची कन्या भाजपमध्ये जाणार!

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इनकमिंगचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांचे शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता नाशिकमधील माजी खासदार वसंतराव पवार यांची कन्या अमृता पवार आणि काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि त्यांचे पुत्र नकुल देशमुख यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम पाहिलेल्या माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांची कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अमृता पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि त्यांचे पुत्र नकुल देशमुख यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे नाशिकमधून भाजपला आणखी बळ मिळणार आहे. शिवाय आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगलीच खेळी खेळल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

Comments
Add Comment