Sunday, October 26, 2025
Happy Diwali

उद्या नवी मुंबईतील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद

उद्या नवी मुंबईतील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व कामोठे, खारघर नोड या परिसरात उद्या १५ मार्चला सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरुवारी १६ मार्च रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे सुरु असल्यामुळे हा पाणीपुरवठा १२ तासासाठी बंद करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने सदर परिसरातील नागरीकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिकेर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment