Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

पुण्यातील तरुणांसाठी खुशखबर! महापालिकेत नोकरीची संधी

पुण्यातील तरुणांसाठी खुशखबर! महापालिकेत नोकरीची संधी

१० वी पास उमेदवारही अर्ज करु शकतात


पुणे: पुणे महानगरपालिकेत नोकऱ्यांची संधी निघाली आहे. यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून http://www.pmc.gov.in/ या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे १० वी पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करु शकतात.

या संकेतस्थळावर एकूण रिक्त पदांसाठी शैक्षणिक अहर्ता, अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची अंतिम तारीख, वेतन आणि वयोमर्यादा याबाबतचा सविस्तर तपशील दिला आहे. तसेच दिलेल्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे.

ही भरती रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, कंपाऊंडर या जागांसाठी आहे. या भरतीद्वारे एकूण ३२० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करतांना १० वी, १२ वीचे प्रमाणपत्र, अन्य शैक्षणिक प्रमाणपत्रं याशिवाय, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली जाहीरात काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर उमेदवारांकडून अर्जात काही त्रुटी राहिल्यास अर्ज रद्द होईल, याची नोंद अर्जकर्त्यांनी घ्यावी.

  • पदे 
    रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट
    वैद्यकीय अधिकारी
    पशुवैद्यकीय अधिकारी
    वरिष्ठ आरोग्य निरीक्षक
    स्वच्छता निरीक्षक
    कनिष्ठ अभियंता (विद्युत)
    कंपाउंडर/औषध निर्माता

  • वर्गनिहाय पदे
    एकून रिक्त पदांपैकी वर्ग १ साठी ८ पदे
    वर्ग २ साठी २३ पदे
    वर्ग ३ साठी २८९ पदे रिक्त आहेत.

  • शैक्षणिक अहर्ता
    या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच १० वी पर्यंत शिक्षणं घेतलेलं असावं. संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक. उमेदवारांनी पदभरती संदर्भातल्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक. पदांनुसार शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

  • वेतन
    पद आणि श्रेणीनुसार वेतन १९ हजार ९०० ते २ लाख ८७ हजार ५०० एवढं असणार आहे.

  • वयोमर्यादा
    पुणे महानगरपालिकेनं जारी केलेल्या भरतीसाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमीत कमी वय १८ वर्ष आणि जास्तीत जास्त वय २८ वर्ष असावं. आरक्षित वर्गासाठी: ४३, ४५ आणि ५५ वर्षे

  • अर्ज शुल्क
    खुल्या प्रवर्गासाठी – १०० रुपये
    मागास प्रवर्गासाठी – ९०० रुपये

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ मार्च २०२३

  • या पदभरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ http://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html

Comments
Add Comment