जोगेश्वरीत फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत २०-२५ दुकाने जळून खाक

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पश्चिम जवळील ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून फायर कूलिंगचे काम सुरु आहे.


आग आटोक्यात आली असली तर यात तब्बल २० ते २५ फर्निचरची दुकाने जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला आज (१३ मार्च) सकाळी अकराच्या सुमारास ही भीषण आग लागली. लाकूड गोदाम आणि फर्निचरचे शॉप असल्यामुळे काही वेळातच आगीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाकडून लेव्हल तीनच्या आगीचा कॉल देण्यात आला होता. सुदैवाने ही आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले.


जोगेश्वरीतील ओशिवरा येथे फर्निचरची मोठी बाजारपेठ आहे. या आगीत सकाळच्या दरम्यान लाकूड गोदामाला भीषण आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल १२ ते १४ गाड्यांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला होता. तब्बल दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.





या आगीचा व्हिडीओ मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तरी, या व्हिडीओमध्ये आगीचे प्रमाण किती भीषण आहे हे दिसून येते.


मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक पोलिसांनी काहीवेळासाठी एस. व्ही. रोड वाहतुकीसाठी बंद केला होता. या ठिकाणी असणारे दुकानदार या भीषण आगीपासून आपल्‍या दुकानातील माल वाचवण्यासाठी ते बाहेर काढताना धडपड असल्‍याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस