मुंबई: तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधींचा पगार किती असतो याबद्दल तुम्हाला कुतुहल असेलच. आमदारांना सरकारकडून किती वेतन मिळते याची माहिती जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक असतात. हा बऱ्याचादा राजकीय चर्चेचा विषय देखील असतो.
३२ लाख रुपयांचं वार्षिक, ५ वर्षांसाठी १,६३,१६,८२०/- रुपये इतकी रक्कम पगार म्हणून मिळते. तसेच यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मोबाईल महिन्याला ९९९ रुपयांमधे आणि लँडलाईन साठी ३३० रुपयांमधे अनलिमीटेड कॅालींग मिळत असतांना आमदारांना ८००० रुपये दिले जातात. जाणून घ्या आमदारांच्या भत्त्याची वर्गवारी आणि मिळणारी रक्कम.
- मूळ वेतन: १,८२,२००/-
- महागाई भत्ता ३४%: ६९,९४८/-
- दूरध्वनी सुविधा भत्ता: ८०००/-
- स्टेशनरी व टपाल सुविधा भत्ता: १०,०००/-
- संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता: १०,०००/-
- एकूण रक्कम : २,७२,१४८/-
- व्यवसाय वजाती : २००/-
- स्टॅम्प बजाती: १/-
- निव्वळ एकूण वेतन: २,७१,९४७/-
(उपरोक्त निवळ एकूण वेतनातून नियमानुसार आयकर बजा करण्यात येतो)