Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘कन्यादान’ मध्ये आत्याबाई निर्मिती सावंतची एन्ट्री

‘कन्यादान’ मध्ये आत्याबाई निर्मिती सावंतची एन्ट्री

  • ऐकलंत का!: दीपक परब

‘कन्यादान’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे हे कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका रंजक वळणावर आली असून या मालिकेत आता निर्मिती सावंतची एन्ट्री होणार असून ती वंदू आत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

विनोदाची महाराणी अशी ओळख असणारी अभिनेत्री निर्मिती सावंत ‘वंदू आत्या’ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. महाले कुटुंबातील अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व असणारी आत्या ‘चांगल्यासोबत चांगली आणि वाईट असणाऱ्यांसोबत तेवढीच वाईट’ अशा स्वभावाची आहे. मात्र आशालता आणि तिच्या तीनही मुलांसाठी आत्या ही नावडती व्यक्ती आहे. महाले कुटुंबातील सर्व रहस्य आणि आशालताच्या कारस्थानी युक्त्यांविषयी वंदू आत्याला सगळं काही माहीत आहे. त्यामुळे आशालतावरही आत्याचा कायम दबाव राहिला असून आशालताने आपल्या तिन्ही मुलांना नेहमीच आत्याविषयी वाईट सांगून त्यांना तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

आता अनेक वर्षांनंतर आत्या महालेंच्या घरी येणार आहे. त्यावेळी तिच्या स्वभावातील विविध पैलू महाले कुटुंबीयांना अनुभवयाला मिळणार आहेत. शिवाय, आजवर ज्या आशालतामुळे या तीनही मुलांना आत्याविषयी राग आहे त्यांनाही आत्याच्या स्वभावातील प्रेमळपणाची जाणीव होणार आहे. अनेक वर्षांनंतर महालेंच्या घरी येणारी वंदू आत्या, आता तिच्या स्वभावातील सकारात्मकता आणि प्रेम त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणार हे पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे. महालेंच्या घरातील गुपितं फोडण्यासाठी येणारी वंदू आत्या भरपूर मजा-मस्ती, आनंद आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा परिपूर्ण खजिना घेऊन येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -