Friday, October 17, 2025
Happy Diwali

एकाच सोसायटीतील तब्बल ३० वाहनांच्या काचा फोडल्या

एकाच सोसायटीतील तब्बल ३० वाहनांच्या काचा फोडल्या

पिंपरी चिंचवड: रुपीनगर परिसरातील सरस्वती हौसिंग सोसायटीत शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने चारचाकी, दुचाकी, तीनचाकी अश्या तब्बल २५ ते ३० गाड्यांच्या काचा फोडल्याने तसेच गाड्यांची नासधूस केल्याने खळबळ उडाली. ही घटना शनिवारी पहाटे ३ वाजून ४५ वाजता घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शनिवारी पहाटे गाडयांच्या तोडफोडीचा आवाज आल्याने नागरिक घराबाहेर आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काही तरुणांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. संबंधिताचा तातडीने शोध लावून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment