Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीआली लहर केला कहर! कपलचा लोकलमध्ये खुलेआम रोमान्स

आली लहर केला कहर! कपलचा लोकलमध्ये खुलेआम रोमान्स

कपलचा बेशरम रंग! लोकल ट्रेनमध्ये ओलांडल्या सर्व मर्यादा

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलही अनेक किस्से, अनुभवांची खाण आहे. इथे रोज प्रवाशांसोबत लोकमधील विक्रेते, भिकारी हेही प्रवास करतात. काहीवेळा या लोकलमध्ये प्रेमी युगलांच्या करामती प्रवाशांना डोक्याला हात लावायला भाग पाडतात. एका कपलने अशीच एक करामत केलीय. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोण नसतानाही एका प्रवाशाने त्यांचा गुपचूप व्हिडिओ काढला आणि सोशल मिडियावर पोस्ट केला. त्यानंतर या व्हिडिओवर अनेक बऱ्या-वाईट प्रतिक्रिया आल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरुण आणि तरुणी एकदम जवळजवळ बसले आहेत. तो तरुण मोबाईलमध्ये काही तरी पाहतोय. पण, तरुणी रोमान्सच्या मूडमध्ये आहे. अचानत ती त्या तरुणाला किस करायला सुरुवात करते. तो विरोध करतोय पण ती ऐकतच नाही. व्हिडीओच्या शेवटी असं दिसतंय की त्यांचं स्टेशन आलं आणि ते उतरण्यासाठी उठले.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉमवरील ट्वीटरवरील Viral Baba या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचं याचा कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -