वाढत्या प्रदूषणामुळे तुमच्या ‘या’ क्षमतेवर परिणाम
मुंबई: कोविड-19 चा प्रकोप पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत. कोविडच्या साथीत ज्यांना या आजाराची लागण झाली त्यात एक मुख्य लक्षण होते वास न येणे. आता यामध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचाही समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे वाढत्या वायू प्रदूषणामुळे आपली वास घेण्याची क्षमता कमकुवत होत आहे.
बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिन येथील रायनोलॉजिस्ट मुरुगप्पन रामनाथन जूनियर यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या अहवालात सांगितलं की, संशोधनानुसार सतत प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने अॅनोस्मिया होण्याचा धोका १.६ ते १.७ पटीने वाढतो. ॲनोस्मिया म्हणजे वास घेण्याची क्षमता कमी होणे.
आधी राजधानी दिल्लीमध्ये हवा वाईट आहे असल्याचं म्हटलं जायचं पण आता आर्थिक राजधानी मुंबईतील हवाही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. थंडीच्या मोसमात मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. या हिवाळ्यात फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.