इन्फ्लूएंझा विषाणूचा उद्रेक, भारतात दोन बळी

  268

नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझा या विषाणूचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसने भारतात दोन जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. यापैकी पहिला मृत्यू कर्नाटकात तर दुसरा हरियाणामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड (COVID) आणि H3N2 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची ९० प्रकरणे समोर आली आहेत तसेच H1N1 चे आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहवालांनुसार आतापर्यंत दोन प्रकारचे इन्फ्लूएंझा विषाणू आढळून आले आहेत.



H3N2 व्हायरस म्हणजे काय?


H3N2 विषाणू हा श्वसनासंबंधी विषाणूजन्य संसर्ग आहे. इन्फ्लूएंझा ए विषाणूचा हा उपप्रकार १९६८ मध्ये मानवांमध्ये सापडला. इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन, रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिन येथील वैद्यकीय शिक्षणाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, या काळात H3N2 विषाणू दरवर्षी वेगाने संक्रमित होतो. शिंका किंवा खोकल्याद्वारे पसरतो.
H3N2 व्हायरसपासून कसे संरक्षण करावे


कोणत्याही विषाणूजन्य संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रथम लसीकरण आवश्यक आहे. नियमित अंतराने साबणाने हात धुवून आपला परिसर स्वच्छ ठेवा. आजारी असलेल्या किंवा मास्क घातलेल्या लोकांशी संपर्क टाळा. जर तुम्हाला शिंक येत असेल किंवा खोकला येत असेल तर फेस मास्क घाला किंवा तोंडावर हात ठेवा कारण व्हायरल इन्फेक्शन्स संसर्गजन्य आहेत.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.