Monday, June 30, 2025

सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

मुंबई: प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. या ७ मार्चला त्यांनी फिल्मी जगतातल्या सेलिब्रिटींसह होळीते सेलिब्रेशन केले. त्यानंतर ते ८ तारखेला कुटुंबासमवेत होते त्यावेळी त्यांना अचानक बैचेन वाटू लागले. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. दरम्यान त्यांची होळीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Satish Kaushik (@satishkaushik2178)




 गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. तेरे नाम हा सिनेमा त्यांच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला. सतीश यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

अभिनेते अनुपम खेर हे सतीश कौशिक यांचे जिगरी दोस्त आहेत. अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.





आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती. आता सतीश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, अशा पद्धतीने अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना या ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.


बॉलीवुड अभिनेता सलमान खान यानेही सतीश कौशिक यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Comments
Add Comment