अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथचा त्रिफळा उडवत त्याला माघारी धाडले. या विकेटसह जडेजाने एक विक्रम आपल्या नावावर केला. जडेजाने स्टीव्ह स्मिथला कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा त्रिफळाचीत केले आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला ४ वेळा बोल्ड करण्याची कामगिरी केली आहे.
जडेजानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथला दोनदा बोल्ड केले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडही तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने स्टीव्ह स्मिथला कसोटी फॉरमॅटमध्ये दोनदा बोल्ड केले आहे. भारताच्या भुवनेश्वर कुमारचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथचा दोनदा त्रिफळा उडवला आहे. या यादीत श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज रंगना हेराथचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत कसोटी सामन्यांमध्ये स्टीव्ह स्मिथला दोनदा बोल्ड केले आहे.