आम्ही सर्व सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : 'खरं सांगू का ज्यावेळी तुम्ही दोन सामने जिंकता त्यावेळी बाहेरचे लोक समजतात की आमच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आम्ही सर्व चारही सामन्यात आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो, अशा शब्दांत भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रत्युत्तर दिले आहे.


रवी शास्त्रींनी भारतीय संघ इंदूर कसोटी हरल्यानंतर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी भारतीय संघ अतीआत्मविश्वासामुळे हरला असे म्हणाले होते. यावर रोहित शर्माने चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कडक शब्दातच प्रतिक्रिया दिली. त्याने हे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचे सांगितले.
रवी शास्त्री यांनी समालोचन करताना भारताच्या पराभवावर वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, 'हा थोडा आत्मसंतुष्टपणा आणि अतिआत्मविश्वासचा परिणाम आहे. संघाने गोष्टी गृहीत धरल्या. तुम्ही निष्काळजीपणा केला त्यांनी तुम्हाला पराभूत केले.'


रोहित शर्माने दीड वर्ष रवी शास्त्रींवर बोलताना संयम बाळगला होता. मात्र त्याला रवी शास्त्रींनी तिसऱ्या कसोटीचे केलेले विश्लेषणाबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्याने कडक शब्दांचा वापर केला.

Comments
Add Comment

Vaibhav Sooryvanshi : वैभवची इन्स्टा पोस्ट व्हायरल ! दुसऱ्या सामन्यात पदर्पण होणार ? चर्चांना उधाण

Manchester : भारत आणि इंग्लंड मधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (जुलै) रोजी मॅंचेस्टर येथे खेळला जाणार

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यावर पावसाचे संकट! पावसामुळे सामना रद्द होणार?

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (४ जुलै) मँचेस्टरमध्ये

FIFA WORLDCUP 2026 : मेस्सीला कडवी झुंज देत केप व्हर्डेचा विश्वचषक प्रवास संपला; वोझिन्हाच्या कामगिरीने जग जिंकले

FIFA WORLDCUP 2026 : डॅलस पोलिसांशी झालेल्या वादावर पडदा; 'प्रकरण संपले', इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांची प्रतिक्रिया

अर्लिंग्टन (टेक्सास) : फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान डॅलसमधील संघाच्या हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर इजिप्तचे

FIFA WORLDCUP 2026 : आरियासच्या एकमेव गोलवर कोलंबियाचा विजय; घानाचा १-० ने पराभव करत राऊंड ऑफ १६ मध्ये धडक

कॅन्सस सिटी (मिसूरी) : जॉन आरियासच्या पहिल्या हाफमधील निर्णायक गोलच्या जोरावर कोलंबियाने घानाचा १-० असा पराभव करत

IND vs ENG T20I : मँचेस्टरमध्ये भारताची कठीण परीक्षा! इंग्लंडविरुद्ध विजयासाठी पार करावी लागतील 'ही' मोठी आव्हाने

मँचेस्टर : बुधवारी झालेला इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील पहिला टी-२० (T20) सामना (Match) पावसामुळे रद्द झाला.