Tuesday, July 1, 2025

मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर केली जहरी टिका

मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर केली जहरी टिका

संजय राऊत, उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल- मोहित कंबोज


मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल संजय राऊत सकाळी सकाळी नशा बंद कर, असं ट्वीट करत त्यांनी ही टीका केली.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल संजय राऊत सकाळी सकाळी नशा करणं बंद कर, नवाब मलिक तर गर्दुल्ला होता, तू देखील सकाळी सकाळी नशा करायला सुरुवात केली आहे असं वाटतंय. जरा तोंड बंद करण्याची गरज आहे, असंही आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.



ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधतात. सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. त्यावरुन भाजप नेते मोहित कंबोज यांनी निशाणा साधलाय, यापूर्वी पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत १०० हून अधिक दिवसांनी तुरुंगाबाहेर आले होते, त्यानंतरही कंबोज यांनी ट्वीट करत संजय राऊतांवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा, त्यानंतर आता त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा