मुंबई (प्रतिनिधी ) : शालेय दप्तराचे वजन कमी व्हावे म्हणून राज्य शिक्षण विभागाने तीसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमध्ये कोरे पान जोडण्याचे निर्णय घेतले होते मात्र आता या निर्णयामध्ये बदल करत आता दूसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आले आहे. यसंदर्भातील एक सुधारित जीआर शिक्षण विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने आपल्या जुन्या निर्णयात बदल तर केलेच आहे. याशिवाय इयत्ता पहिलीचे पुस्तकही चार विभागात विभागले जाणार आहे. यामध्ये सुद्धा काही वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने मागील आठवड्यात गुरुवारी (२ मार्च) प्रसिद्ध केला होता. राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खासगी आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील. पाठ्यपुस्तकांना दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ गृहपाठ यांसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी राहील. नवीन पुस्तकांमध्ये प्रत्येक धडा, कविताच्या मागे दोन पाने जोडण्यात येणार असून विद्यार्थ्यांना महत्त्वाची नोंद या पानांमध्ये करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्र्य वही घेण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जातांना केवल पुस्तक घेऊन जायचे आहे. घरचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगळी वही ठेवण्याची मुभा यावेळी देण्यात आली आहे.
पुस्तकांची किंमत वाढणार
दप्तराचे वजन कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने जे निर्णय घेतले आहे ते विद्यार्थ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे यामध्ये दुमत नाही मात्र पुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाला जास्त पैसे खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पुस्तकांची किंमत वाढण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकारकडून ही पुस्तके तयार करण्यासाठी अनुदान मिळाले तर विद्यार्थ्यांना आहे त्या किंमतीमध्ये पुस्तके मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.