Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीउद्या राज्याचे बजेट! अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित

उद्या राज्याचे बजेट! अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित

मुंबई (विशेष प्रतिनिधी): सन २०२२-२३ च्या पुर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ७.० टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२२-२३मध्ये राज्याच्या कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात १०.२ टक्के, उद्योग क्षेत्रात ६.१ टक्के आणि सेवा क्षेत्रात ६.४ टक्के वाढ अपेक्षित आहे.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात सादर केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. पुर्वानुमानानुसार सन २०२२-२३ मध्ये सांकेतिक (नॉमिनल) (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ३५,२७,०८४ कोटी अपेक्षित आहे आणि वास्तविक (रिअल) (सन २०११-१२ च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न २१,६५,५५८ कोटी अपेक्षित आहे.

पहिल्या सुधारित अंदाजांनुसार सन २०२१-२२ चे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ३१,०८,०२२ कोटी होते, तर सन २०२०-२१ मध्ये ते २६,२७,५४२ कोटी होते. सन २०२१-२२ चे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न २०,२७,९७१ कोटी होते, तर सन २०२०-२१ मध्ये ते १८,५८,३७० कोटी होते. सन २०२१-२२ मध्ये दरडोई राज्य उत्पन्न २,१५,२३३ होते, तर सन २०२०-२१ मध्ये ते १,८३,७०४ होते. एप्रिल ते डिसेंबर, २०२२ या कालावधीत ग्रामीण व नागरी भागाकरिता सरासरी ग्राहक किंमती निर्देशांक अनुक्रमे ३४९.० व ३३३.३ होता. कोविड-१९ महामारीच्या निर्बंधांमुळे एप्रिल, २०२१ करिता जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती संकलनात अडचणी आल्या आणि खाद्यपदार्थ गटाव्यतिरिक्त इतर गटातील वस्तुंच्या किंमती उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे,२०२१- २२करिता मे, २०२१ ते मार्च, २०२२ या कालावधीकरिता ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यात आला. मे ते डिसेंबर, २०२२ या कालावधीत ग्रामीण व नागरी भागाकरिता सरासरी ग्राहक किंमती निर्देशांक अनुक्रमे ३५०.८ व ३३४.९ होता आणि मे ते डिसेंबर, २०२२ या कालावधीत सरासरी ग्राहक किंमती निर्देशांकावर आधारित वर्ष-ते-वर्ष चलनवाढ ग्रामीण भागाकरिता ८.१ टक्के व नागरी भागाकरिता ७.३ टक्के होती, असे यात नमूद करण्यात आले आहे.

अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन २०२२-२३ करिता राज्याची महसुली जमा ४,०३,४२७ कोटी, तर सुधारित अंदाजानुसार सन २०२१-२२ करिता ३,६२,१३३ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन २०२२-२३ करिता कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे ३,०८,११३ कोटी आणि ९५३१४ कोटी आहे. माहे एप्रिल ते नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा २,५१,९२४ कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६२.४ टक्के) आहे.

अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन २०२२-२३ करिता राज्याचा महसुली खर्च ४,२७,७८० कोटी अपेक्षित असून सुधारित अंदाजानुसार सन २०२१-२२ करिता ३,९२८५७ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन २०२२-२३ करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा २६.५ टक्के अपेक्षित असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा २२.० टक्के अपेक्षित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -