Sunday, August 31, 2025

बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमध्ये यशस्वी

बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमध्ये यशस्वी

वेलिंग्टन (वृत्तसंस्था) : गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे त्रस्त असलेला भारताचा भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमध्ये यशस्वी झाली. दरम्यान बुमराहला मैदानात परतण्यासाठी किमान ६ महिन्यांची कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिथे इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर उपचार करण्यात आले. त्याच डॉक्टरांनी बुमराहची न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया केली आहे. तसेच, याच डॉक्टरांकडे न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज शेन बाँडनेही उपचार घेतले होते.

पाठीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह आधीच आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. पण याच वर्षी होणाऱ्या विश्वचषकात मात्र जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. बुमराहला संपूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही दिवसांच्या विश्रांतीची आवश्यक असेल. बुमराहची रिकव्हरी झाल्यानंतर रिहॅबिलिटेशन सुरू होणार आहे. ज्यामध्ये तीन ते ५ महिन्यांचा वेळ लागू शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा