जागतिक महिला दिनानिमित्त आजींच्या कविता प्रकाशनाच्या वाटेवर!

मुरबाड (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील साता समुद्रापार गेलेली लिम्काबुक प्राप्त ‘आजीबाईंची शाळा’ हा जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. याच आजीबाईंचे संपूर्ण जीवन काव्यरूपाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रकाशित होत आहे.


कै. मोतीराम गणपत दलाल ट्रस्ट संचालित आजीबाई शाळा, फांगणे या शाळेचा शुभारंभ ८ मार्च २०१६ रोजी इंदुमती मोतीराम दलाल यांच्या शुभहस्ते झाला. या शाळेत येणाऱ्या ३२ आजीबाईंचे संपूर्ण जीवनदर्शन कवितेच्या रूपाने मांडण्याचे काम इतिहास संशोधक लेखक वक्ते,कवी शिक्षक योगेंद्र बांगर यांनी केले आहे.


‘आजीबाईची शाळा’ हा जागतिक स्तरावर नोंद झालेला शिक्षणातील आणि सामाजिक जाणिवेतून आविष्कृत झालेला एक अभिनव प्रयोग एक सर्वसाधारण आणि प्रयोगशील शिक्षक योगेंद्र शांताराम बांगर यांच्या संकल्पनेतून साकारला.


परंपरा आणि परिस्थितीमुळे ज्यांना शिक्षण घेता आले नाही, अशा आजींना शिक्षणाचे धडे देणारी फांगणे येथील आजीबाईची शाळा ही आज सर्वदूर पोहोचली. या आजींचे भावविश्व व स्वभावचित्र साकारणारा योगेंद्र बांगर लिखित काव्यसंग्रह पीपल्स पब्लिकेशन्सच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रकाशित होत आहे.


या पुस्तकाच्या माध्यमातून आजींच्या राहिलेल्या या एका स्वप्नाची पूर्तता होणार आहे. आजींचे स्वप्न पूर्ण करण्यास सदर काव्यसंग्रहाचा हातभार लागणार आहे. कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप दलाल, कवी योगेंद्र बांगर, शिक्षिका शितल मोरे व पीपल्स पब्लिकेशनचे प्रकाशकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी