अहमदनगर : जिल्ह्यातील दोन महत्वाचे तसेच ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील शीतयुद्ध काही नवीन नाही. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी काही सोडत नाहीत. यातच आता विखे पाटील यांनी थोरातांवर निशाणा साधला आहे. थोरातांची पत संपली आहे असा वारच थेट विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर केला.
विखे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, थोरातांना सत्ता गेल्याचे वैफल्य आले आहे. सत्तेत राहून तुम्ही जनतेला काही न्याय देऊ शकला नाही. तुम्ही केवळ वाळू माफियांचे भले केले. तुम्ही एक उदाहरण दाखवून द्या ज्यामध्ये तुम्ही जनतेचं भले केलं. आज आम्ही जनतेला वेठीस धरणाऱ्या सर्व अपवृत्तीचा बंदोबस्त केला आहे. सत्ता गेल्याच दुःख थोरातांना आहे मात्र आता आपलं कोणी ऐकत नाही, आपली पत संपलेली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला आहे. तुम्ही या निवडुकीतील पराभवाची जबाबदारी देखील स्वीकारली नाही आहे.
राज्याचे महसूलमंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव असलेल्या जोर्वे येथे आले होते. यावेळी विखे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात विखे यांचे स्वागत केले. यावेळी मोठी साउंड सिस्टिमसह हजारो कार्यकर्ते यावेळी विखेंच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते. ओपन गाडीतून विखे यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी कार्यकर्तांनी मोठया उत्साहाने विखेंचे स्वागत केले.