Tuesday, January 21, 2025
Homeमहत्वाची बातमीजळगावला १०वीच्या २४ विद्यार्थ्यांना दिली चुकीची प्रश्नपत्रिका

जळगावला १०वीच्या २४ विद्यार्थ्यांना दिली चुकीची प्रश्नपत्रिका

बोर्डाने मागविला अहवाल

जळगाव (प्रतिनिधी) : जळगावला दहावीच्या २४ विद्यार्थ्यांना चुकीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला येथील प. न. लुंकड कन्याशाळेच्य केंद्रावर एका वर्गात इंग्रजी लोअर अभ्यासक्रमाऐवजी हायर अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांनी वाटण्यात आली. विद्यार्थ्यांनी तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष केले गेल्याचे पालकांचे म्हणणे असून पेपर झाल्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन केंद्र संचालकांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला.

या प्रकरणी शिक्षण्ण मंडळाला कळवण्यात आले असून याची गंभीर दखल घेत बोर्डाने या बाबतचा अहवाल मागवला आहे. सोमवारी इंग्रजी तृतीय भाषेचा पेपर होता. प. न. लुंकड कन्याशाहेत एका वर्गात असलेल्या २४ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हा तृतीय भाषेचा पेपर न देता कोड ३ असलेल्या इंग्रजी हायरची प्रश्नपत्रिका दिली गेली. प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी व अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न पाहता विद्यार्थ्यांनी ही आमची प्रश्नपत्रिका नाही, चुकीची प्रश्नपत्रिका दिली गेल्याची तक्रार प्रश्नपत्रिका हातात पडताच पर्यवेकांकडे केली. मात्र पर्यवेक्षकांनी जस येईल तस लिहा सांगत वेळ मारून नेली.
त्यांनी तत्काळ केंद्र संचालकांकडे तक्रार करणे, ही बाब कानावर घालणे गरजेचे होते मात्र तसे घडले नाही. पेपर संपल्यानंतर मुलांच्या पालकांनी केंद्र संचालकांकडे धाव घेत चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याचे सांगितले. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. अखेर कंद्र संचालक यांनी बोर्डाला फोनवर ही बाब सांगितली असता ताबडतोब याचा अहवाल पाठवण्यास सांगण्यात आला.

कॉपीचा सुळसुळाट

अनेक केंद्रांवर इंग्रजीच्या पेपरला देखील मोठ्या प्रमाणावर कॉपी झाली. मात्र एकही कारवाई झाली नाही. त्यामुळे केंद्रावर भरारी पथके शिक्षण विभागाने, जिल्हा प्रशासनाने नेमल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ही पथके कोठे आहेत, असा सवाल निर्माण झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -