मुंबई: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या विजयाची जितकी चर्चा नाही तितकी याच लीगमधील एका महिला खेळाडूची आहे. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना एक नवीन इंटरनॅशनल क्रश मिळाली आहे. या न्यूझीलंडच्या खेळाडूच्या निरागस सौंदर्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्स संघावर १४३ धावांचा दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात अनेक खेळाडूंनी तुफान खेळी केली. त्यातच एका महिला आंतरराष्ट्रीय खेळाडूनं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भूरळ पाडली आहे. सध्या सोशल मीडियावर महिला क्रिकेटपटू अमेलिया केर हिची जोरदार चर्चा रंगली आहे. तिच्या निरागस सौंदर्यांमुळे चाहते घायाळ झाले आहेत.
कोण आहे अमेलिया केर?
अमेलिया केर न्यूझीलंडची सध्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्समधून खेळणारी क्रिकेटपटू आहे. अमेलिया २२ वर्षांची आहे. अमेलियाने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, यावेळी ती फक्त १६ वर्षांची होती. अमेलिया केर महिलांच्या क्रिकेट संघातील ऑल राऊंडर खेळाडूंपैकी एक आहे.