मुंबई (प्रतिनिधी) : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ५ ते ८ मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ७ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असून नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.