१९ तारखेला तयार राहा! कदमांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा
खेड: या १९ मार्चला खेडमधील याच ठिकाणी याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे गुलाब पाटील, शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सभा घेऊन उद्धव ठाकरेंची व्याजासकट परतफेड करणार असल्याचा घणाघाती वार रामदास कदम यांनी केला आहे. ते खेडमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ते म्हणाले, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आजही आहे आणि उद्याही असेल तसुभरही त्यात फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे मुंबई ठाणे, पुणे, सिंधूदूर्ग, रत्नागिरी इथून माणसं गोळा करुन आणणार आहेत जणू काही शिवाजी पार्क दसऱ्याची सभाच आहे. इतका धसका त्यांनी रामदास कदमांचा घेतला आहे. पण लोक भाषण एकतील आणि निघून जातील त्याचं पुढे काहीही होणार नाही. कारण मुळातच उद्धव ठाकरेंचे खेडमध्ये स्थानिक समर्थकच नाहीत.
रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. यावर रामदास कदमांनी या अशा सभेची मी नोंदही घेत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.