Tuesday, August 5, 2025

डब्ल्यूपीएलचे अँथम साँग रिलीज

डब्ल्यूपीएलचे अँथम साँग रिलीज

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : महिला प्रीमियर लीगचा (डब्ल्यूपीएल) पहिला हंगाम यंदा होत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने स्पर्धेचे अँथम साँग रिलीज केले. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी शुक्रवारी ट्विटरवरून या साँगचा व्हीडिओ शेअर केला आहे.


जय शहा यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून महिला प्रीमियर लीगचे अँथम साँग रिलीज केले. शहा यांनी व्हीडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, महिला प्रीमियर लीगचा सलामीचा सामना सुरू होताच ऊर्जा आणि उत्साहाचे साक्षीदार व्हा. #YehTohBasShuruatHai! या गाण्यात प्रसिद्ध गायक शंकर महादेवनसह ६ कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. या व्हीडिओत भारताची युवा खेळाडू शफाली वर्माही दिसत आहे.





महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स या एकूण पाच संघांनी भाग घेतला आहे. या ५ संघांमधील सर्व २२ सामने मुंबईतील दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील.



मुंबई इंडियन्सनेही गाणे केले रिलीज


मुंबई इंडियन्सनेही महिला प्रीमियर लीग २०२३ साठी आपले अँथम साँग रिलीज केले. या गाण्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघातील इतर खेळाडू उत्साहात दिसत आहेत. त्याचवेळी या फ्रँचायझीच्या मालक नीता अंबानीही या व्हीडिओमध्ये दिसत आहेत. ३० सेकंदांचा हा व्हीडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ती आली रे… एक गाना, एक आवाज, एक क्रांती.”

Comments
Add Comment