मुंबई (प्रतिनिधी) : ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महापलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरू असताना महापालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गळती दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे गुरुवार ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, दिनांक ११ मार्चला सकाळी १० पर्यंतच्या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ११ मार्च रोजी सकाळी १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात १० टक्के पाणी कपात केले जाणार आहे.
पूर्व उपनगरामध्ये टी विभागात मुलूंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग, एस विभागात भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग, एन विभागातील विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग, एल विभागातील कुर्ला (पूर्व) विभाग, एम/पूर्व संपूर्ण विभाग, एम/पश्चिम संपूर्ण विभाग येथे, तर शहर विभागातील ए विभागात बीपीटी व नौदल परिसर, संपूर्ण बी विभाग, संपूर्ण ई विभाग, संपूर्ण एफ/दक्षिण विभाग, संपूर्ण एफ/उत्तर विभाग येथे पाणी कपात केले जाणार आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…