Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीसंदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात

संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात

हल्लेखोर शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना भांडूप भागातून ताब्यात घेतले आहे. दोन जणांपैकी अशोक खरात हे शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. ते भांडुपच्या कोकण नगर विभागाचे रहिवासी आहेत. आज सकाळी साडेसहा वाजता गुन्हे शाखेने खरात यांना ताब्यात घेतले आहे.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज (४ मार्च) दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

मॉर्निंग वॉक करताना संदीप देशपांडे यांच्यावर मास्क लावून आलेल्या चौघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क येथे शुक्रवारी घडली. शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आठ पथके तैनात करण्यात आली असून पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यात एका शिवसैनिकाचाही समावेश आहे.

पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. त्यामध्ये, आरोपी सदर ठिकाणाहून पलायन करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी जबाबात म्हटले आहे की, सकाळी नेहमीप्रमाणे ६.५० च्या सुमारास माहीम येथील घरातून मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्क मैदानाकडे निघालो. मैदानाचे गेट क्रमांक ५ येथे सातच्या सुमारास पोहोचलो. मात्र, अन्य मित्र आले नव्हते. म्हणून एकट्यानेच वॉक सुरू केले. मैदानाचा एक राऊंड पूर्ण करून सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाच्या गेट ५ कडून पुढे येताच, कुणीतरी मागून उजव्या पायाच्या मांडीवर फटका मारला म्हणून मागे वळून पाहताच चार तरुण दिसले. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बॅट होते. शिव्या घालून पत्र लिहितोस का? ठाकरेंना नडतोस का? वरुणला नडतोस का?, असे विचारत मारहाण केली. यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी केली. त्यांनाही ओरडून धमकाविण्याचा प्रयत्न केला. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -