Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

गजेंद्र सिंह शेखावत यांची बदनामी करणे अशोक गहलोतांना भोवले

गजेंद्र सिंह शेखावत यांची बदनामी करणे अशोक गहलोतांना भोवले

राजस्थान : राजस्थानात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत विरुद्ध राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात सामना रंगणार आहे. अशोक गहलोत यांनी बदनामी केली असा सनसनाटी आरोप गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला आहे. त्यांनी आज दुपारी २ वाजता अशोक गेहलोत यांच्याविरोधात राऊस एव्हेन्यू कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला.


फेब्रुवारीमध्ये जोधपूरच्या भेटीदरम्यान, सीएम गेहलोत यांनी सर्किट हाऊसमध्ये संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित पीडितांची भेट घेतली होती. यावेळी पीडितांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील घरांबाबत झालेल्या कोट्यावधीच्या घोटाळ्यात हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पीडित पक्षाचे म्हणणे लक्षात घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.


यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीत म्हटले, ''अशा व्यक्तीला मोदीजींनी केंद्रीय मंत्री कसे केले ? गजेंद्रसिंह शेखावत हे स्वत: आरोपी असल्याचे मी गेल्याच दिवशी सभागृहात सांगितले होते. यानंतर अटकेच्या भीतीने गजेंद्र सिंह शेखावत यांनी सुरक्षा वाढवली. असे माफिया देशभर फोफावत आहेत, यापूर्वी आदर्श पत सहकारी संस्थेत घोटाळा झाला होता, त्याचे मालकही भाजपशी संबंधित होते. लोकांची लुट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल'', असेही ते यावेळी म्हणाले.


मात्र, दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन शेखावत यांनी मुख्यमंत्र्यांचे आरोप फेटाळून लावले होते. ते म्हणाले, ''माझ्या चारित्र्याला बदनाम करून मला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचे कारस्थान सुरू असून राजस्थानचे मुख्यमंत्री तपास यंत्रणेचा हत्यार म्हणून वापर करत आहेत. हा एकच प्रयत्न नाही, यापूर्वीही ते असे अनेक प्रयत्न करत आहेत".

Comments
Add Comment