Wednesday, July 17, 2024
Homeमनोरंजनधडाकेबाज ‘राखी सावंत’वर बनतोय चित्रपट...

धडाकेबाज ‘राखी सावंत’वर बनतोय चित्रपट…

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत सध्या तिच्या आयुष्यात घडत असलेल्या विविध घटनांमुळे चर्चेत आहे. आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडत असताना राखीने आता करिअरकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने पाऊल उचलत राखीने अभिनयाची कार्यशाळा सुरू केली आहे. अशातच आता ‘ड्रामा क्वीन’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राखीचा पती आदिल खान दुर्रानी हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. राखीच्या नव्या सिनेमाची घोषणा तिचा भाऊ राकेश याने केली आहे. ‘ड्रामा क्वीन’च्या आगामी सिनेमाचे नाव ‘रावडी राखी’ असे असणार आहे. या सिनेमात राखी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती राखीचा भाऊ राकेश करणार आहे. ‘राऊडी राखी’ सिनेमाबाबत बोलायचे म्हणजे, राखी खरोखरच रावडी आहे. तिला त्रास देणाऱ्या लोकांना ती तिच्या पद्धतीने सरळ करते. राखीने तिचा पती आदिल याला देखील चांगलाच धडा शिकवला आहे.

तगडी स्टारकास्ट

‘रावडी राखी’ या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असून राखी मुख्य भूमिकेत असेल. अनेक दिग्गज कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. असरानी, मनोज जोशी, सयाजी शिंदे आणि अनु कपूर या सिनेमात दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप राखीने यासंदर्भात भाष्य केलेले नाही. राखीच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या सिनेमात राखीची भूमिका कोण साकारणार याबाबतही बरीच उत्सुकता आहे.

राखीचा पती आदिल खान पोलिसांच्या ताब्यात आहे. राखीने तिच्या पतीवर मारहाण, फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि विवाहबाह्य संबंधासारखे अनेक आरोप केले आहेत. पतीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर राखीने दुबईत अभिनय कार्यशाळा आणि डान्स क्लास सुरू केला आहे. तसेच एका म्युझिक व्हीडिओवर ती काम करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -