Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरजनावरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

जनावरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

जव्हार (प्रतिनिधी) : जव्हार शहरापासून अवघ्या ५ कि.मी.अंतरावर नंदनमाळ धाब्याजवळ मागील बाजूस बंद असलेल्या पोल्ट्रीफॉर्म जवळ जनावरांची तस्करी करून गाईची कत्तल केली. ही घटना, शेतावर राहणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना बोलावून शोध घेवून हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर गावक-यांनी वेळीच जव्हार पोलीस प्रशासनांना खबर दिली. मंगळवारी मध्यरात्री जव्हार पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींवर गोहत्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

याबाबत अधिक काहिती अशी, जव्हार तालुक्याच्या परिसरातून रात्रीच्यावेळी गावातून जनावरे चोरीला जाण्याचे प्रकार, घटना गेल्या चार, ते पाच महिन्यांपासून सतत घडत होत्या. या अगोदरसुद्धा मार्च ते मे महिन्यात मोकाट जनावरे सतत गायब होत होते. त्यानंतर चोरीला गेलेली जाणारे दुसऱ्या गावात ईतर ठिकाणी शोध घेऊनही मिळत नव्हती, अशी या परिसरातील अनेकांची जाणवरे चरायला गेली आणि जनावरे पुन्हा आलीच नाही. त्यानंतर शोध घेऊनही जनावरे मिळत नव्हते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

जव्हार कुंडाचापाडा येथील फिर्यादी मोहन अशोक चिभडे (२१ वर्ष) यांनी हा प्रकार उजेडात आणून दिला आहे. गोहत्या करणाऱ्या आरोपींची धाब्याजवळ धावपळ बघून मोहन चिभडे यांनी नंदनमाळ गावातील ग्रामस्थांना बोलावून हा गोहत्येचा प्रकार समोर आणला. गेल्या दोन दिवसांपूर्वी कुंडाचापाडा गावातील मोहन चिभडे या व्यक्तीची गाय चोरीला गेली असता, गाईचा शोध घेत असताना, फिर्यादी चिभडे यांनी या आरोपींना बघून, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, अशी शंका लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या साथीदार आणि नंदनमाळ ग्रामस्थांना घेवून, धाबा गाठला. तेथे जनावरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले. येथे डांबून ठेवण्यात आलेल्या जनावरांची हत्या केली होती. त्यात फिर्यादी मोहन चिभडे या व्यक्तीची हरवलेली गायदेखील आढळली. त्यामुळे या नागरिकांनी तातडीने जव्हार पोलीस ठाण्यात माहिती देऊन आरोपींना अटक केली. याशिवाय जव्हार, मोखाडा व विक्रमगड या भागातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे गायब झाल्याच्या तक्रारी वाढल्या असून चोरीला गेलेल्या जनावरांना याच पाच जणांनी पळविले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गोवंश हत्या करणारे आरोपींची नावे अशी -शहजाद गुलजार खतीब, गुलजार अनवर खतीब, फैज गुलजार खतीब, मुसद्दीक गुलजार खतीब हे चारही आरोपी २० ते २२ वर्षाचे असून, ते ख्याजानगर डोंगरी मनोर, पालघर जिल्ह्यातील आहेत. यापैकी पाचवा आरोपी सादिक शक्कील खतीब (४५ वर्षे), रूम नं.२ हुमा अपारर्टमेंट, शिवाजीनगर राबोडी, ठाणे येथील आहे.

घडलेल्या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजीव पिंपळे करीय असून त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये, यांनी आरोपींना अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांना लेखी पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जव्हार तालुका यांनी जव्हार पोलिसांना लेखी पत्र देवून या गोहत्या करणाऱ्या आरोपींविरुध्द कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे जव्हार तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागांमध्ये पारंपरिक व्यवसाय हा शेती आहे. शेती करीत असताना,जनावरांची नितांत आवश्यकता असते. परंतु अशा परिस्थितीत जनावरे चोरीला गेल्यास शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊन शेती करण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी संपूर्ण तालुक्यातून होत आहे. गोहत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जव्हार तालुका अध्यक्ष गोपाळ वझरे, शहराध्यक्ष नवीन घोलप यांनी पोलिस निरीक्षकांना लेखी पत्र देऊन केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -