Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणभाजप युवा मोर्चाचा आज मालवणात मेळावा

भाजप युवा मोर्चाचा आज मालवणात मेळावा

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण ( प्रतिनिधी ): मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा मार्गदर्शन मेळावा आज ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे व भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे.रोजगाराच्या दिशा, शैक्षणिक धोरणातील बदल, यांसह संघटन वाढीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. अशी माहिती भाजपा युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी दिली आहे.

या मेळाव्यात भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, शहर अध्यक्ष चारुशीला आचरेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर आदींची उपस्थिती असणार आहे. तरी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, यावेळी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, निकित वराडकर, सरचिटणीस निषय पालेकर, राकेश सावंत, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -