नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता १४ मार्चला होणार आहे. आज केवळ दोन तासात सुनावणी संपली.
आज शिंदे गटाकडून अॅड. नीरज कौल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर अॅड. हरीश साळवे यांनी बाजू मांडली. मात्र, काही कारणास्तव त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही.
आता होळीनंतर १४ मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे १४ मार्चलाच शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर न्यायालय निकाल देईल.