मुंबई (वार्ताहर) : महिला प्रीमियर लीगचा थरार शनिवारपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेकरिता सहभागी संघ आपली जर्सी समोर आणत आहेत. मुंबई इंडियन्स संघाची जर्सी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता दिल्ली, युपीसह बंगळुरु संघाची जर्सी कशी असणार आहे, ते देखील समोर आले आहे. फ्रँचायझींनी आपआपल्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत या जर्सीचे व्हीडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
महिला आयपीएल स्पर्धा यंदा प्रथमच रंगणार आहे. ४ मार्चपासून सामन्यांना सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाच्या महिला क्रिकेटर सहभागी होत असून संघ व्यवस्थापनांनी देखील जोरदार तयारी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाची जर्सी काही दिवसांपूर्वी समोर आली होती.