- साईश्रद्धा: विलास खानोलकर
साई माझे पंढरपूर
शिर्डीस आनंदाला पूर
तेथेच सुखशांती महापूर
दर्शनाने भरून येतो ऊर ।।१।।
साईची गोरगरिबांवर नजर
साई संकटाला करी बेजार
साईचा प्रेमाचा साक्षात्कार
साई पळवे जीवाचा आजार।।२।।
साई माझे सर्वस्व
साई करे साऱ्यांना आश्वस्थ
साई सान्निध्यात मुले-बाले स्वस्थ
साईदर्शन करी मनोवृत्ती मस्त।।३।।
साई माझी जणू दूध साई
साई माझ्या पेनातील शाई
साई माझ्या भरे बोरू दौतात शाई
साई माझी सरस्वती आई ।। ४।।
आई मनोरमेत पाहे साई
अमर आईत पाहे साई
उज्ज्वल आईत पाहे साई
आईच्या सीमेपल्याड साई ।। ५।।
प्रिय मला सिंकदर पौरस आई
प्रिय मला जिजाऊ आई
सिंधुताई सकपाळ हजारोंची आई
मदर टेरेसा लाखोंची आई ।। ६।।
प्रिय मला ती श्यामची आई
प्रिय मला ज्ञानेश्वरांची आई
प्रिय मला तुकारामांची आई
प्रिय मला नामदेवांची आई ।। ७।।
साऱ्या प्रेमळ नजरेत दिसे आई
नित्य वंदनीय महात्मा गांधींची आई
धन्य ती विनोबांची आई
धन्य धन्य आमटेंची बाबा आई।। ८।।
साऱ्यांना शिकविली विश्वशांती साई
श्रद्धा-सबुरी अहिंसा प्रेमसाई
गाईच्या प्रेमळ नजरेत साई
बेंबे बकरीच्या डोळ्यांत साई ।। ९।।
हरीणपाडसाच्या डोळ्यांत साई
सशा पिल्ल्याच्या नजरेत साई
ओरिओ मनीच्या पिल्लात साई ।।१०।।
गरीब बाळाच्या नजरेत साई
फकीर वासुदेवांच्या नजरेत साई
लुळ्या-पांगळ्याच्या नजरेत साई
आजारी पेशंटच्या डोळ्यांत साई ।।११।।
पुनर्जन्म देणाऱ्या डॉक्टरांत साई
तात्या लहानेच्या रूपात मोठासाई
जयपूर फूट वाटणाऱ्यात साई
कोरोना योद्धात दिसे साई ।। १२।।
भूकंप, पुरात वाचवे साई
आगीत फायर ब्रिगेडमध्ये साई
जखमीला झेलून घेई साई
पडणाऱ्याला सावरे साई ।।१३।।
आयुर्विम्याच्या दिव्यातील तेल साई
मेडिक्लेमची काठी सावरे संकटात साई
डॉ. नितू मांडके, रामाणीत दिसे साई
उपकार करण्यात प्रथम दिसे साई ।।१४।।
उपचार आगीचे भाजलेल्यावर साई गाडगेबाबांत स्वच्छतादूतात साई
प्रत्येक गुरूत महागुरू साई
ब्रह्मा विष्णू महेश दत्तगुरूत साई।।१५।।