Thursday, June 19, 2025

मीच कुठेतरी कमी पडलो, विनम्रपणे निकाल स्वीकारतो - हेमंत रासने

मीच कुठेतरी कमी पडलो, विनम्रपणे निकाल स्वीकारतो - हेमंत रासने

पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी मीच कुठेतरी कमी पडलो, विनम्रपणे निकाल स्वीकारतो, असे म्हणत पराभव मान्य केला.


हेमंत रासने यांनी माध्यमांशी बोलताना प्रांजळ कबुली दिली. मी बुथवाईज आकडेवारी पाहिल्यानंतरच सर्व गोष्टींचे बारकाईने विश्लेषण करीन. मात्र, मी कुठे कमी पडलो ते मी पाहिन, मला आत्मचिंतन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया रासने यांनी दिली.


पक्षाने मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास दर्शवला, सर्व यंत्रणा माझ्यासाठी काम करत होती. मात्र, केवळ मी उमेदवार म्हणून कमी पडलो, जो निकाल लागला तो मी स्विकार करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.


कसबा पेठेत पहिल्यांच निवडणूक थेट दोघांमध्ये झाली, दुरंगी निवडणूक झाली. यापूर्वीच्या निवडणुकांचा अभ्यास केल्यास, मोठ्या प्रमाणात बहुरंगी निवडणूक झाली आहे. अनेक उमेदवार रिंगणात होते. पण, यंदा थेट दोघांमध्ये निवडणूक झाल्यानेही पराभवाचा सामना करावा लागला असेल, असेही रासने यांनी म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा