नवी दिल्ली : ईशान्येतील विधानसभा निवडणुकीत त्रिपुरातील ६०, मेघालयातील ५९ आणि नागालँडमधील ६० जागांसाठीचे कल येत आहेत. यात भाजप आघाडीला नागालँडमध्ये ४६ आणि त्रिपुरामध्ये ३५ जागा मिळताना दिसत आहेत. एनपीपी २५ जागांसह मेघालयातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. एक्झिट पोलमध्येही हाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
नागालँड विधानसभेचा कार्यकाळ १२ मार्च रोजी संपणार आहे. मेघालयातील विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च आणि त्रिपुरामध्ये २२ मार्च रोजी संपत आहे.
येथे मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप युतीला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणजेच त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे.