संतोष बांगर यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना डाकू म्हणत त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याने त्यांच्याविरोधात भाजप व शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले आहेत.
संजय राऊत हे आमच्या मतावर निवडून आले आणि आम्हालाच चोर म्हणतात. मी म्हणतो संजय राऊत तर डाकू आहेत. त्यांच्यावर ३९५ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना बाहेर फिरु देणार नाही, अशी टीका बांगरांनी केली. दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी राऊतांवर हक्कभंग आणावी अशी मागणी केली आहे.