Saturday, October 25, 2025
Happy Diwali

संजय राऊत नालायक माणूस, त्याचे संरक्षण काढा!

संजय राऊत नालायक माणूस, त्याचे संरक्षण काढा!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

मुंबई : विधीमंडळाचा 'चोरमंडळ' असा उल्लेख करणा-या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत एकेरी भाषेत सडकून टीका केली.

संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. हे विधिमंडळ नसते तर तो खासदार पण झाला नसता. थोडी जरी लाज राहिली असेल तर त्याने खासदारकीचा राजीनामा द्यावा. चौकाचौकात त्याची धिंड काढली पाहिजे. संजय राऊतला आमच्या हवाले करा, जेणेकरून त्याची धिंड काढू शकतो. संजय राऊत याच्यावर कायदेशीर प्रक्रिया झालीच पाहिजे, संजय राऊतची सरकारने सुरक्षा काढावी, अशी मागणी नितेश राणे यांनी विधानसभेत केली.

संजय राऊतचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. तो सामनात येण्याआधी त्याचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही, असे संजय राऊतने लिहिले होते. राऊतांना दिलेले संरक्षण काढा. ते पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेले संरक्षण आहे,” असे नितेश राणे यांनी म्हटले.

तसेच आपल्याला रोज सकाळी संजय राऊतचे ऐकावे लागते. महाराष्ट्राला याची गरज आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी केला.

त्याचे मार्मिकमध्ये छापलेले कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असे छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचे १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असे वक्तव्य राणेंनी केले.

Comments
Add Comment