Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीघरगुती सिलेंडर ५० तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागले

घरगुती सिलेंडर ५० तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागले

नवी दिल्ली : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. या महागाईत आता आणखी भर पडणार आहे. आजपासून म्हणजेच १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर तब्बल ३५० रुपयांनी महाग झाले आहे. यामुळे इतर वस्तूंच्या किमती देखील वाढणार आहे.

राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर २११९.५० तर घरगुती एलपीजी सिलिंडर ११०३ रुपयांना आता मिळणार आहे.

मुंबईत एलपीजीची किंमत १०५२.५० रुपयांवरून ११०२.५० रुपये, कोलकातामध्ये एलपीजीची किंमत १०७९ रुपयांवरून ११२९ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत १०६८.५० रुपयांवरून १११८.५० रुपयांपर्यंत वाढली आहे. तब्बल ८ महिन्यांनी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -