Thursday, May 15, 2025

देशराजकीयमहत्वाची बातमी

संसदेतील शिवसेना कार्यालयातील ठाकरे पिता पुत्रांचे फोटो हटवले

संसदेतील शिवसेना कार्यालयातील ठाकरे पिता पुत्रांचे फोटो हटवले
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून त्याठिकाणी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावले

नवी दिल्ली : संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून त्याठिकाणी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत.


याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर गल्ली ते दिल्ली फरक जाणवू लागला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे यांनी ताबा घेतला. त्यानंतर आता हा बदल दिसून आला आहे.

Comments
Add Comment