Saturday, October 18, 2025
Happy Diwali

संसदेच्या गटनेतेपदी गजानन किर्तीकर!

संसदेच्या गटनेतेपदी गजानन किर्तीकर!

नवी दिल्ली : संजय राऊतांना हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून संसदेच्या गटनेतेपदी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्याचे पत्र संसदीय कार्यमंत्र्यांना दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संघर्षावरील सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुरु झाली आहे. सत्तासंघर्षावरील सुनावणी याच आठवड्यात संपणार असल्याची माहिती घटनापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ८ महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेवाळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी शेवाळे म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्यानुसार आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते शिंदे आहेत. राज्यसभेचे गटनेते आता संजय राऊत आहेत. मात्र यापुढे संसदेचा गटनेता ठरविण्याचा अधिकार शिंदे यांनाच आहे. त्यानुसार संसदीय कार्यमंत्र्यांना संसदेचा गटनेता म्हणून गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती शेवाळे यांनी दिली.

राज्यसभेत तीन खासदार आहेत. त्यात संजय राऊत यांचाही समावेश आहे. त्यांनाही शिवसेनेचा व्हिप मान्य करणे अनिवार्य असल्याचे शेवाळे यांनी नमूद केले. मात्र आता लगेच संसदेच्या अधिवेशनात व्हिप देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र गटनेतेपदावरून संजय राऊत यांना हटविण्याची प्रक्रिया शिवसेनेकडून सुरू करण्यात आली हे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांनी जो फ्लोअर टेस्टचा निर्णय घेतला, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची वेगळी भूमिका होती. परंतु विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे होते. नेता म्हणूनच त्यांनी राज्यपालांना पत्र दिले होते. विधीमंडळ नेता म्हणूनच आमदारांनी शिंदेंवर दबाव आणला होता. गटनेता म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र पाठवल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >