
इंदूर : राष्ट्रीय तपास यंत्रणानी (एनआयए) दिलेल्या माहितीच्या आधारे अखेर सरफराज मेमन याच्या मुसक्या आवळण्यात महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला यश आले आहे. सरफराज याला इंदोरमधून ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा एनआयएकडून मुंबई पोलिसांना एक मेल आला होता. या मेलमध्ये सरफराज मेमन यांच्याबद्दल माहिती देण्यात आली होती. एनआयएकडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशाराही देण्यात आला होता.
हे पण वाचा : महिन्याभरापूर्वी अलर्ट देऊनही दहशतवादी मुंबईत घुसलाच
मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची एनआयएने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना माहिती पुरवली होती. एनआयएच्या माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे.
सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती एनआयएने दिली होती. या माहितीच्या आधारे एनआयएने पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले होते. एनआयएच्या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आले असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे.