Sunday, September 14, 2025

भिवंडीतील सोसायटीत टोरेंट पॉवर कंपनीचे मीटर जळून खाक

भिवंडीतील सोसायटीत टोरेंट पॉवर कंपनीचे मीटर जळून खाक

भिवंडी: भिवंडी शहरातील कोंबड पाडा येथील गिरीराज हाऊसिंग सोसायटीत बसवण्यात आलेल्या टोरेंट पावर कंपनीच्या मीटरमध्ये दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले. यामुळे लागलेल्या आगीत सोसायटीचे आठ ते दहा मीटर जळून खाक झाले.

याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला देताच, अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरीही येथील हे मीटर संपूर्ण जळाले आहेत.

Comments
Add Comment