Sunday, March 23, 2025
Homeमहत्वाची बातमीRussia-Ukraine War : युक्रेनचा बेलारूसच्या एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला

Russia-Ukraine War : युक्रेनचा बेलारूसच्या एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला

बेलारुसमध्ये घुसून रशियाचे हेरगिरी करणारे विमान केले नेस्तनाबूत

मिंस्क : रशिया-युक्रेन मध्ये युद्ध सुरु असताना बेलारुसमध्ये घुसून लष्कराच्या विमानतळावर असलेले रशियाचे हेरगिरी करणारे ए-५० विमान युक्रेनने नेस्तनाबूत केले आहे. बेलारूसची राजधानी मिंस्कमध्ये एका एअरबेसवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. हे विमान युक्रेन युद्धाची गोपनीय माहिती मिळवत होते. हे विमान नेस्तनाबूत झाल्याने रशियाच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे.

यामुळे आता बेलारूसला युद्धात उडी घेण्याची आयती संधी मिळाली आहे. बेलारूस हा आपल्या देशात घुसून केलेला हल्ला असे समजू शकते आणि रशियाच्या बाजुने प्रत्यक्षपणे युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आतापर्यंत या घटनेला स्वतंत्रपणे दुजोरा कोणीही दिलेला नाही. परंतू या हल्ल्यात विमानाच्या पुढील आणि मधल्या भागाला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे दोन स्फोट झाले आहेत. यामुळे रडारही नष्ट झाला आहे. बेरिव्ह ए-५० विमान हे एकाचवेळी ६० लक्ष्यांवर लक्ष ठेवू शकणारे विमान होते.

बेलारुसचे हुकुमशहा लुकाशेंकोचे विरोधक अलेक्‍जेंडर अजरोव यांनी पोलंडच्या एका न्यूज चॅनलला सांगितले की, ‘हल्ला करणारे ड्रोन होते. या मोहिमेवर बेलारुसचे लोक होते. ते आता सुरक्षित आहेत आणि देशाच्या बाहेर आहेत.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -