Monday, May 12, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

प्राजूची मराठी भाषा दिनी खास पोस्ट म्हणते, प्रेम करावं भिल्लासारखं...

प्राजूची मराठी भाषा दिनी खास पोस्ट म्हणते, प्रेम करावं भिल्लासारखं...

मुंबई: समाजमाध्यमांवर विविध पोस्ट टाकत चर्चेत असणारी गुणी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे. यावेळी तिने मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करत एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. प्राजक्ताची पोस्ट जितकी सुंदर तितकाच तिचा त्यासोबतचा अस्सल पारंपरिक मराठी साज असलेला फोटोही भाव खातोय. काय आहे ही पोस्ट चला वाचूया.






 










View this post on Instagram























 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)




 प्राजक्ता शुभेच्छा देताना लिहिते, "प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं.. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं… प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहीलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं माझ्या “मराठीवर”… जे आहे आज, राहील उद्या, परवा.. मरणोत्तरही….. .“मराठी भाषा गौरव दिनाच्या”; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…

प्राजक्ताने तिच्या खास अंदाजात सर्वांना विशेष करुन तिच्या चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताच्या पोस्ट्स वर तिच्या चाहत्यांनी कमेंटस आणि लाईक्सचा पाऊस पाडत, पसंतीचं शिक्कामोर्तब केलंय. या पोस्टसोबत जो तिचा फोटो आहे त्यात तिने वापरलेले दागिने हे तिच्या प्राजक्तराज या ब्रँडचे आहेत ज्याचं अनावरण काहीच महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं.


प्राजक्ताची रानबाजार वेब सिरिजमधील बोल्ड भूमिका आणि पांडू सिनेमातली खलनायकी भूमिका प्रचंड गाजली. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचंही निवेदन करत आहे.


Comments
Add Comment