नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर देशातील कुस्तीपटूंनी लावलेल्या शारीरिक शोषणाच्या गंभीर आरोपाच्या प्रकरणाला मोठा वळण आले आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या दोन्ही समित्यांचे सदस्य लैंगिक छळाच्या तक्रारीचे तथ्य लीक करत असल्याचे ट्वीट कुस्तीपटू विनेश फोगटने केले आहे.
मीडिया रिपोर्ट्स वाचल्यानंतर याची माहिती मिळाली. त्यामुळे त्या सदस्यावर कडक कारवाई करून त्यांना समितीतून तत्काळ हटवावे असे विनेशने म्हटले आहे. विनेश फोगटने ट्विटमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग केले.
विशेष म्हणजे मेरी कोमला IOA आणि क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. तर दोन्ही समित्यांमध्ये फक्त हरियाणाचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा समावेश आहे. ज्यावर विनेशने आधीच विरोध दर्शविला आहे.